-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री करिष्मा तन्ना ५ फेब्रुवारीला वरुण बंगेरासोबत विवाह बंधनात अडकली.
-
करिष्माने लग्नसोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोला तिने ‘जस्ट मॅरीड’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
बदामी रंगाचा लेहेंगा आणि ज्वेलरीमध्ये नववधू करिष्मा नटली होती.
-
तर वरुणने शेरवानी आणि फेटा परिधान केला होता.
-
करिष्मा आणि वरुणच्या लग्न समारंभातील खास क्षण.
-
करिष्माने मेहेंदीसाठी पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
-
पेट कोकोसोबत करिष्मा तन्ना.
-
पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि फ्लोरल ज्वेलरी या हळदीसाठी केलेल्या पेहरावात करिष्माचं सौंदर्य खुलून आलं होतं.
-
हळदी समारंभातील खास क्षण.
-
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘अदालत’ या मालिकांमधून करिष्मा घराघरात पोहोचली.
-
तसेच ‘बिग बॉस ८’, ‘नच बलिये’ या रिऍलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता.
-
‘खतरो के खिलाडी १०’ या रिऍलिटी शो ची विजेती ठरली होती.
-
करिष्मा तन्ना आणि वरुण बंगेरा गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते.
-
वरुण हा एक रियल इस्टेट बिझनेसमॅन असून एका कॉमन फ्रेंडद्वारे त्यांची ओळख झाली होती.
-
करिष्मा आणि वरुणने कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत १२ नोव्हेंबर २०२१ रोजी साखरपुडा केला होता.
-
करिष्मा तन्नाने वरुण बंगेरासोबत नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
-
चाहते आणि कलाकारांनी करिष्मा आणि वरुणला कमेंट्स करून शुभेच्छा दिल्या आहेत. (सर्व फोटो : करिष्मा तन्ना /इन्स्टाग्राम)

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला