-
दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा आगामी ‘गहराइयां’ (Gehraiyaan) चित्रपटाची सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.(@deepikapadukone/ Instagram)
-
या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्यासमवेत धैर्य कारवा या कलाकारांना मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. (@deepikapadukone/ Instagram)
-
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून धैर्य कारवा (Dhairya Karwa)या अभिनेत्याचं नाव चर्चेत आलं आहे. (@dhairyakarwa / Instagram)
-
अनेकांना ‘धैर्य कारवा’चा हा पहिलाचं चित्रपट आहे असं वाटत आहे. पण तसं नाही. जाणून घेऊयात धैर्य करवा या कलाकाराबद्दल.(@dhairyakarwa / Instagram)
-
धैर्य कारवा याचा जन्म १९ नोव्हेंबर १९९० रोजी झाला. (@dhairyakarwa / Instagram)
-
जयपूर, राजस्थान येथे जन्मलेला, धैर्य कारवा हा एक भारतीय अभिनेता-मॉडेल आहे जो डेहराडून, उत्तराखंड येथे मोठा झाला. (@dhairyakarwa / Instagram)
-
एका अहवालानुसार, धैर्यने दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बीकॉम (ऑनर्स) पूर्ण केले आणि नंतर मुंबईतील एका संस्थेतून एमबीए केले. (@dhairyakarwa / Instagram)
-
आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अभिनेत्याने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला आणि ‘तनिष्क’, ‘टायटन’, ‘विस्तारा एअरलाइन्स’ आणि इतर बर्याच लोकप्रिय ब्रँडसाठी शूट केलं. (@dhairyakarwa / Instagram)
-
धैर्यने स्वतःला एक कुशल अभिनेता म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी मुंबईतील एका अभिनय शाळेत देखील प्रवेश घेतला होता. (@dhairyakarwa / Instagram)
-
धैर्यने विकी कौशलच्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ (२०१९) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (@dhairyakarwa / Instagram)
-
त्यांने कॅप्टन सरताज सिंग चंधोकची भूमिका साकारली जो भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी म्हणून दाखवलं होत. (@dhairyakarwa / Instagram)
-
‘गहराइयां’ मध्ये मुख्य भूमिका साकारण्याआधी, धैर्य रणवीर सिंगच्या नवीनतम चित्रपट ‘८३’ मध्ये देखील दिसला होता. (@dhairyakarwa / Instagram)
-
माजी क्रिकेटपटू आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक (पुरुष), रवी शास्त्री यांची भूमिका केलेल्या धैर्यचे कामगिरीबद्दल कौतुक झाले होते. (@dhairyakarwa / Instagram)
-
२०२१ मध्ये, चित्रपट निर्माता करण जोहरने धैर्यला त्यांच्या सेलिब्रिटी मॅनेजमेंट वेंचर धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी (DCA) चा एक भाग म्हणून घोषित केले होते. (@dhairyakarwa / Instagram)
-
गहराइयां चित्रपटातील कामाबद्दलही धैर्यचं कौतुक होत आहे. यशस्वी मॉडेल ते अभिनेता असा धैर्यचा प्रवास कौतुकास्पद आहे. (@dhairyakarwa / Instagram)

कुटुंबीयांचा विरोध ते १६ वर्षांचा सुखाचा संसार; गिरीश ओक व पल्लवी ओक यांची प्रेमकहाणी आहे खूप खास, म्हणाले…