-
बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत १९ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहे.
-
दोघेही गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत.
-
फरहान त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायच चर्चेत असतो.
-
फरहान अख्तरचं हे दुसरं लग्न आहे.
-
फरहानने २००० साली अधुना भबानीशी लग्न केले होते.
-
१९ वर्ष एकत्र राहिल्यानंतर २०१७ मध्ये घटस्फोट घेत एकमेकांपासून ते वेगळे झाले.
-
फरहान आणि अधुनाला अकिरा आणि शाक्या या दोन मुली आहेत.
-
घटस्फोटानंतर दोन्ही मुलींचा ताबा अधुनाकडे गेला.
-
फरहान आणि त्याची पहिली पत्नी अधुना यांच्यात अजूनही मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
-
घटस्फोट घेतल्यानंतरही जबाबदार पालक म्हणून मुलींच्या वाढदिवसानिमित्त ते अनेकदा एकत्र दिसले आहेत.
-
मुलगी अकिरा आणि शाक्या सोबत फरहान अख्तर.
-
फरहानची पहिली पत्नी अधुना भबानी ही लोकप्रिय सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आहे.
-
बी ब्लंट या सलॉनची अधुना मालकीण आहे.
-
‘दिल चाहता है’, ‘दिल धडकने दो’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘दंगल’ अशा ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांसाठी तिने काम केलं आहे.
-
अधुना फरहानपेक्षा ६ वर्षांनी मोठी आहे.
-
अधुना अभिनेता डिनो मोरियाचा भाऊ निकोलो मोरियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
-
निकोलो मोरियाची अधुनाच्या आयुष्यात झालेली एन्ट्री त्यांच्या घटस्फोटाचं कारण असल्याचं बोललं जात होतं.
-
फरहान आणि अधुना यांची एका नाईट क्लबमध्ये ओळख झाली होती.
-
त्यानंतर त्यांच्या भेटी वाढू लागल्या. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन नंतर त्यांनी लग्न केलं.
-
फरहान अधूनमधून अधुनाच्या फोटोंवर कमेंट करत असतो.
-
(सर्व फोटो : फरहान अख्तर, अधुना भबानी / इन्स्टाग्राम)

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?