-
‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळणार आहे.
-
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत.
-
काही प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.
-
सचिन खेडेकर यांनी सोशल मीडियावर काही काही प्रश्न विचारले आहेत.
-
“पुष्पा, पुष्पराज, मै झुकेगा नही…” ही प्रसिद्ध ओळ “पुष्पा द राइज” चित्रपटात कोणत्या अभिनेत्याने म्हंटली आहे?
१. अल्लू अर्जुन
२. राणा डगूबट्टी
३. ज्युनिअर एन टी आर
४. प्रभास -
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला कोणाचे नाव देण्यात आले?
१. प्रबोधनकार ठाकरे
२. यशवंतराव चव्हाण
३. आचार्य अत्रे
४. स्वातंत्र्यवीर सावरकर -
पुढीलपैकी कोणते पात्र पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील नाही?
१. सखाराम गटणे
२. नारायण
३. अंतू बर्वा
४. चिमणराव -
२४ नोव्हेंबर २०२१ला दक्षिण आफ्रिकेने जलद पसरणाऱ्या सार्स कोविड-२ च्या कोणत्या नव्या प्रकाराबद्दल जागतिक आरोग्य संस्थेला माहिती दिली?
१. डेल्टा
२. लॅम्बडा
३. एप्सिलॅान
४. ओमिक्रॉन -
छत्रपती संभाजी महाराज्यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
१. शिवनेरी
२. पुरंदर
३. रायगड
४. मुरड जंजिरा -
काल्पनिक पात्र अल्लाद्दीन त्याच्या जीनला प्रकट करण्यासाठी कोणती गोष्ट घासत असे?
१. हात
२. जादूचा चेंडू
३. जादूची चटई
४. जादूचा दिवा -
२०२२ च्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या ऑलिम्पिक पदक विजेत्याला परम विशिष्ठ सेवा पदकाने भूषविले गेले?
१. रवी कुमार दहिया
२. अभिनव बिंद्रा
३. नीरज चोप्रा
४. राज्यवर्धन सिंह राठौड -
या प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यास ‘कोण होणार करोडपती’ च्या हॉट सीटवर बसण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : सोनी मराठी / इन्स्टाग्राम)

9