-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.
-
अभिज्ञा भावे हिचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त तिला अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
नुकतंच अभिज्ञा भावेची जिवलग मैत्रीण अभिनेत्री श्रेया बुगडे हिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
-
यात तिने तिचे आणि अभिज्ञाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत तिने त्याला हटके कॅप्शनही दिले आहे.
-
ही पोस्ट शेअर करताना श्रेया बुगडे म्हणाली, “गाडीला असतात चाकं चार, अभ्या तुला happy bday यार !!”
-
“हो आनंदाच्या घोड्यावर स्वार , तूच आमची superstar!! भेटू तेव्हा Party करू मिळून आपण चौघं चार, तुला लै लै प्यार, तुला लै लै प्यार ..तुला लै लै प्यार ……यार”, असेही श्रेयाने म्हटले आहे.
-
“ही अशीच आहे ना आपली मैत्री, काहीही झालं तरी शेवटी आपण सगळं ‘जुळवून’ आणतोच. नाही का!”, असेही तिने यात सांगितले आहे.
-
यासोबतच श्रेयाने ‘ही दोस्ती तुटायची नाय’, असा हॅशटॅग शेअर करत अभिज्ञाला ही पोस्ट टॅग केली आहे.
-
दरम्यान अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिज्ञा भावे या दोघींचीही जोडी सिनेसृष्टीत फार प्रसिद्ध आहे.
-
या दोघीही सतत एकमेकींसोबत वेळ घालवताना आणि फिरताना दिसून येतात.
-
फक्त आनंदाच्या क्षणांमध्येच नव्हे तर कठीण काळातही या दोघी नेहमीच एकमेकींच्या पाठीशी उभ्या असतात.

महिलांनो, फ्रिजमध्ये एकदा नक्की ठेवा मिठाने भरलेली वाटी; तुमची पावसाळ्यातील ‘ही’ मोठी समस्या होईल कायमची दूर, पाहा कमाल