-
मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकत नंबर वन हे बिरुद कायम ठेवलं आहे.
-
दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिकांना मनोरंजनाची पर्वणी देणाऱ्या या वाहिनीवर लवकरच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ पाहायला मिळणार आहे.
-
स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष आहे. मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहामध्ये नुकताच हा रंगारंग सोहळा पार पडला.
-
स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
रेड कार्पेटवरचा कलाकारांचा हटके अंदाज लक्ष वेधणारा होता.
-
एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या लोकप्रिय कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये आपण भेटत असतो.
-
स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा अनोखा अंदाज भाव खाऊन गेला.
-
रविवार ३ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता हा दैदिप्यमान सोहळा स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
-
स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे.

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?