-
सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या कालानुरुप मालिकांच्या कथानकांमध्येदेखील अमुलाग्र बदल होताना दिसत आहे.
-
काही लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.
-
अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेतून बारा वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी लवकरच सोनी मराठीवरील ‘सुंदर आमचं घर’ या मालिकेत दिसणार आहेत.
-
अभिनेत्री शिल्पा तुळसकर झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
अभिनेत्री तितिक्षा तावडे लवकरच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत दिसणार आहे.
-
अभिनेत्री रेणुका शहाणे झी मराठीवरील ‘बँड बाजा वरात’ या आगामी कार्यक्रमात दिसणार आहे.
-
मराठी अभिनेत्री संचिता कुलकर्णी लवकरच सोनी मराठीवरील ‘सुंदर आमचं घर’ या मालिकेत दिसणार आहे.
-
झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या या मालिकेतून अभिनेत्री अभिज्ञा भावे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

बापरे! महिलांनो बाजारातून कढीपत्ता घेताना सावधान! “हा” VIDEO पाहाल तर झोप उडेल; यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल