-
बॉलीवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणे फारच अवघड गोष्ट आहे. त्यातच वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये गुंतवणूक करणे त्याहूनही धोकादायक आणि अवघड काम. परंतु, अनेक अभिनेत्रींनी हा धोका पत्करला आहे आणि त्यामध्ये त्या कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत. आज आपण अशाच काही अभिनेत्रींनबद्दल जाणून घेऊया.
-
अनुष्का शर्माने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून केली होती.
-
अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, अनुष्काने स्वतःचा कपड्यांचा ब्रँड स्थापन केला आणि ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ नावाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील उघडले.
-
प्रियांका चोप्राने बॉलिवूडसोबतच हॉलिवूड चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला आहे. ती आता एक ग्लोबल आयकॉन आहे.
-
तिने चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवल्यानंतर लगेचच स्वतःचे प्रोडक्शन हाऊस ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ सुरू केले.
-
बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोणचा नावलौकिक आहे. तिने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
-
दीपिकाने २०१८ मध्ये ‘का प्रॉडक्शन’ नावाने स्वतःची कंपनी स्थापन केली. ‘छपाक’ हा तिच्या कंपनीच्या बॅनरखाली निर्माण झालेला चित्रपट. यात तिने स्वतः मुख्य भूमिका साकारली आहे.
-
अलीकडेच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये आलिया भटने मुख्य भूमिका साकारली. तिच्या अभिनयासाठी तिचे खूप कौतुक झाले.
-
आलियाने २०२१ मध्ये तिचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस ‘इटरनल सनशाइन’ स्थापन केले.
-
अभिनेत्री कंगना राणावतने देखील निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण केले आहे. कंगनाने २०२१ साली ‘मणिकर्णिका फिल्म्स’ या नावाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले.
-
अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका असलेला आणि कंगनाच्या बॅनर खाली तयार झालेला ‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट आधीच अॅमेझॉन प्राईमला विकला गेला आहे.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल