-
अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट हे मराठी चित्रपटसृष्टीतील आयडियल कपल आहेत.
-
ही लोकप्रिय जोडी सध्या हम्पीमध्ये व्हॅकेशनचा आनंद घेताना दिसतेय.
-
प्रिया आणि उमेशने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हम्पी ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत.
-
कर्नाटक राज्यातील हम्पी शहर ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिध्द आहे.
-
येथील ऐतिहासिक वास्तू आणि निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.
-
हम्पीमधील सनापूर तलाव, मातंग टेकडी, तुगंभद्रा नदी या पर्यटन स्थळांना उमेश आणि प्रियाने देखील भेट दिली.
-
तेथील जीवनशैलीचे दर्शन घडवणारे फोटो प्रियाने शेअर केले आहेत.
-
हम्पी येथील सनापूर तलावाजवळ शांतता अनुभवताना उमेश कामत.
-
हम्पीमधील प्रसिध्द अशा मातंगा टेकडीवर ट्रेकिंग करत प्रियाने सुर्याेदयाचा आनंद घेतला.
-
हम्पी ट्रिप एन्जॉय करताना उमेश आणि प्रिया.
-
तेथील खाद्यपदार्थांचाही त्यांनी आस्वाद घेतला.
-
विशेष म्हणजे प्रिया आणि उमेशची ही पहिली वहिली रोड ट्रिप होती.
-
“हम्पी शहर खूप सुंदर आहे. २००७ मध्ये मी या शहराला भेट दिली होती. शहराचं बदललेलं रुपही मला तितकंच भावलं. ही आमची पहिली रोड ट्रिप होती. अशा अनेक रोड ट्रिप आम्हाला करायच्या आहेत.”, असं कॅप्शन देत प्रियाने फोटो शेअर केले आहेत.
-
प्रिया आणि उमेशच्या रोड ट्रिपमधील खास फोटो.
-
(सर्व फोटो : उमेश कामत, प्रिया बापट/ इन्स्टाग्राम)

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”