-
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा परदेशात राहत असली तरीही भारतीय सण साजरे करताना दिसते. आताही प्रियांकानं लॉस एंजेलिसमध्ये पती निक जोनससोबत होळी साजरी केली.
-
या सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात प्रियांका आणि निकचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय.
-
प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्रामवर होळी सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती निकला रोमँटिक अंदाजात रंग लावताना दिसत आहे.
-
निक सुद्धा मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करताना दिसत आहे.
-
इन्स्टाग्रामवर होळी सेलिब्रेशनचा फोटो शेअर करताना प्रियांकानं लिहिलं, ‘काही खास आणि मजेदार क्षण माझ्या वाट्याला आले. ज्यावेळी संपूर्ण जग भीतीच्या छायेखाली जगत आहे अशा काळात मला आशीर्वाद मिळाला.’
-
प्रियांका पुढे लिहिते, ‘तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा. माझ्या सर्व मित्रपरिवाराचे आणि कुटुंबीयांचे धन्यवाद ज्यांनी देसी अंदाजात होळी साजरी केली. या क्षणांसाठी मी स्वतःला खूपच नशीबवान मानते.’
-
प्रियांकानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती निकला रंग लावताना, किस करताना दिसत आहे.
-
दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रियांका आणि निक आई-बाबा झाले आहेत. त्यामुळे यंदाची होळी या दोघांसाठीही खूप खास आहे. (फोटो- प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम)

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख