-
अनेक टीव्ही अभिनेत्रींनी लग्न आणि प्रेग्नंसीमुळे हिट मालिका सोडल्या. जाणून घेऊयात या अभिनेत्री सध्या काय करतात…
-
‘अनुपमा’ हा एक हिट टीव्ही शो आहे. हा शो खूप दिवसांपासून जबरदस्त TRP मिळवत आहे. या शोमध्ये नंदिनीची भूमिका साकारणाऱ्या अनघा भोसलेने केवळ या मालिकेलाच नाही तर अभिनय करिअरलाही अलविदा केला आहे. अनघा ही श्रीकृष्णाची भक्त असून तिने अध्यात्माचा मार्ग निवडला आहे.
-
श्वेता साळवेने लग्नानंतर अभिनय क्षेत्र सोडलं आणि गोव्यात स्वतःचे रेस्तरॉं उघडलं.
-
ऋषिका मिहानीने अभिनय करिअर सोडले आहे. ती दुबईला शिफ्ट झाली असून तिथे रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणून काम करत आहे.
-
टीव्ही अभिनेत्री सौम्या सेठ लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली होती. २०१९मध्ये घटस्फोट झाल्यानंतर ती यूएसमध्ये रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करत आहे.
-
मोहिना सिंगने लग्नानंतर अभिनय करिअर सोडले. सध्या ती घरीच असून लवकरच डान्स स्कूल उघडणार असल्याचं कळतंय.
-
अभिनेत्री सना खानने अभिनय करिअर सोडले आहे. लग्नानंतर ती पतीसोबत व्यवसाय सांभाळत आहे.
-
आशका गोराडियाने अभिनय सोडून स्वतःचा कॉस्मेटिक ब्रँड सुरू केला आहे. ती तिच्या पतीसोबत गोव्यात राहते आणि एक योगा स्कूलही चालवते.
-
अभिनेत्री रुचा हसबनीसने साथ निभाना साथिया ही हीट मालिका सोडली. त्यानंतर तिने २०१५ मध्ये राहुल जगदाळेसोबत लग्न केलं. (फोटो – सोशल मीडिया)

महिलांनो लघवी करताना ‘या’ चुका करू नका! मोजावी लागेल मोठी किंमत, दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा…