-
छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखलं जाते.
-
हृताने ‘फुलपाखरू’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.
-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे. नुकतंच हृता दुर्गुळेने झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘किचन कल्लाकार’मध्ये हजेरी लावली.
-
यावेळी तिच्यासोबत ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत इंद्राची भूमिका साकारणार अभिनेता अजिंक्य राऊतही सहभागी झाला होता.
-
या कार्यक्रमात हृताने तिचा प्रियकर आणि टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शाह याच्यासोबत लग्नाची घोषणा केल्यानंतर एक धक्कादायक घटना उघड केली आहे.
-
या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे याने हृताला एक प्रश्न विचारला आहे. “सोशल मीडियावर आतापर्यंत अशा कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागला, ज्यामुळे तुला खूप त्रास झाला?” असा प्रश्न संकर्षणने विचारला होता..
-
त्यावर हृताने तिच्या आयुष्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला. “मी प्रतीक शाहसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर मला अनेकांना ट्रोल केले. त्यामुळे मी खरोखरच फार निराश झाली”, असे ती यावेळी म्हणाली.
-
“सोशल मीडियावर माझा खूप मोठा चाहता वर्ग आहे. मी इतक्या वर्षात कधीही सोशल मीडियावर माझे वैयक्तिक आयुष्य उघड केले नाही. सोशल मीडियावर माझे २.३ मिलियन चाहते आहेत”, असे तिने म्हटले.
-
“त्यामुळे मला असे वाटले की मी माझ्या आयुष्यातील सर्वाधिक काळ हा सोशल मीडियावर घालवते. ते सर्वजण माझ्या कुटुंबाप्रमाणेच आहेत”, असे ती म्हणाली.
-
“मी प्रतीक शाहसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यासोबत साखरपुडा करणार आहे, ही बातमी सोशल मीडियावर शेअर करावी. असे मला वाटले”, असेही हृताने सांगितले.
-
“त्यानुसार मी ती बातमी सोशल मीडियावर शेअर केली. त्यावेळी मी तो हिंदी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहे हे देखील सांगितले. मात्र यामुळे मला ट्रोलिंगचा सामना करावा लागला”, असेही हृता म्हणाली.
-
“माझ्या या निर्णयानंतर मला अनेक लोकांनी ट्रोल केले. माझ्या आयुष्यातील इतकी महत्त्वाची गोष्ट मी जाहीर केल्यानंतर लोक त्याचे आनंदाने स्वागत करतील असे मला वाटत होते. पण तसे झाले नाही. त्याउलट मला ट्रोलिंगचा सामना करावा लागला”, असे तिने म्हटले.
-
“नेहमी मराठी अभिनेत्री हिंदी किंवा हिंदी भाषेत काम करणाऱ्या लोकांशी लग्न का करतात, असे म्हणत अनेक लोकांनी मला ट्रोल केले”, असेही ती म्हणाली.
-
“मला हिंदी टीव्ही शोमध्ये काम करायचे आहे, म्हणून मी प्रतीकसोबत लग्न करत आहे”, असेही काहींनी यावर म्हटले.
-
“तर काहींनी त्याच्या लूकवरही भाष्य केले. त्यामुळे मी खूपच निराश झाले होते”, असे ती म्हणाली.
-
कोणाच्या भावना दुखावल्या जातील अशी विधाने शेअर करु नका, असे आवाहन हृताने केले होते.

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला