-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजासोबत फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.
-
सोनम कपूर आई होणार ही बातमी ऐकल्यानंतर तिचे चाहते प्रचंड खूश असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केल्यानंतर नुकतंच सोनम कपूरने मुंबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावली. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
यावेळी तिचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत सोनम कपूरचे बेबी बंप पाहायला मिळत आहे. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
सोनम कपूरचा पती आनंद आहुजाने मुंबईत एक नवे दुकान सुरु केले आहे. या दुकानाच्या लाँच इव्हेंटमध्ये ती सहभागी झाली होती.
-
यावेळी तिने निळ्या रंगाचा सूट आणि पांढऱ्या रंगाच्या टॉप परिधान केला होता. यासोबत तिने पांढऱ्या रंगाचे शूजही परिधान केले होते.
-
या कार्यक्रमात सोनम कपूर, आनंद अहुजासोबतच अभिनेते अनिल कपूरही उपस्थित होते. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
सोनम कपूरचे बेबी बंपसोबतचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
-
दरम्यान सोनम कपूरने ही गुडन्यूज शेअर केल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींसह तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी