-
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा सुरु आहे.
-
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे.
-
‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
-
या चित्रपटात आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु हे दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
-
अभिनेता आकाश ठोसर हा या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.
-
आकाश हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो.
-
नुकतंच आकाशने ‘झुंड’च्या सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यात आकाश हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सीनचे शूटींग करताना पाहायला मिळत आहे.
-
या दृश्याच्या शूटींगदरम्यान काढलेले काही फोटो आकाशने शेअर केले आहेत.
-
‘पडद्यामागे’, असे कॅप्शन देत आकाशने हे फोटो पोस्ट केले आहे. यासोबत त्याने झुंडचा हॅशटॅगही वापरला आहे.
-
विशेष म्हणजे आकाशने शेअर केलेले हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहे.
-
त्या फोटोवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.
-
त्याच्या या पोस्टवर हार्ट, स्माईल यासारख्या इमोजींचा वर्षाव सुरु आहे.
-
तसेच त्याची ही पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
-
दरम्यान या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

२८ जुलैनंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात संकट! अचानक वाढेल खर्च तर प्रियकरासोबत होईल भांडण; वाचा तुमच्या नशिबी काय…