-
बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांनी दुसरं लग्न करणं टाळलं. या अभिनेत्रींपैकी काहींच्या अफेअरची चर्चा आहेत, तर काही अभिनेत्री सिंगल असून त्या आपल्या मुलांची काळजी घेतात.
-
पूजा भट्टने २००३ मध्ये होस्ट मनीष माखिजासोबत लग्न केले, पण २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. नंतर पूजाने पुन्हा लग्न केलं नाही.
-
संगीता बिजलानीने १९९६ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले, परंतु १४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर हे जोडपे वेगळे झाले. घटस्फोटानंतर संगीताने दुसरं लग्न केलं नाही.
-
बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याआधीच चित्रांगदा सिंग विवाहित होती आणि एका मुलाची आई होती. परंतु बॉलीवूडमध्ये करिअर करण्याच्या तिच्या निर्णयामुळे तिचे पती, गोल्फर ज्योती रंधावा यांच्याशी मतभेद वाढले आणि त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर चित्रांगदा सिंगल आहे.
-
कोंकणा सेन शर्माने २०१० मध्ये रणवीर शौरीसोबत लग्न केले, मात्र तीन वर्षांनी दोघे वेगळे झाले. घटस्फोटानंतर कोंकणाने दुसरं लग्न केलं नाही.
-
अभिनेत्री जेनिफर विंगेट ही करण सिंग ग्रोव्हरची दुसरी पत्नी होती. दोघांनी २०१२ साली लग्न केले. मात्र, करण आणि जेनिफरचा दोन वर्षांत घटस्फोट झाला. यानंतर करणने बिपाशा बसूशी लग्न केले तर जेनिफर अजूनही सिंगल आहे.
-
पूजा बेदी आणि फरहान फर्निचरवाल यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली होती. दोघांनी १९९४ मध्ये लग्न केले. लग्नानंतर पूजाने दोन मुलांना जन्म दिला. पण कालांतराने पूजा आणि फरहानमध्ये कलह होऊ लागला. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. परंतु पूजाने दुसरं लग्न केलं नाही.
-
अभिनेता फरहान अख्तरने पत्नी अधुना अख्तरसोबत घटस्फोट घेतला. त्याने काही दिवसांपूर्वीच शिबानी दांडेकरसोबत लग्न केलं. परंतु फरहानची पत्नी सिंगल आहे.
-
सैफ अली खानने अमृता सिंगसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करीना कपूरसोबत लग्न केलं. परंतु अमृताने दुसरं लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
-
करिश्मा कपूरने २००३ मध्ये अभिषेक बच्चनसोबतचे लग्न मोडल्यानंतर बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. या लग्नापासून दोघांना दोन मुले आहेत. लग्नानंतर करिश्मा कपूरने चित्रपटसृष्टीला पूर्णपणे निरोप दिला होता. लग्नानंतर काही वर्षांनी करिश्मा आणि संजय यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघेही वेगळे राहू लागले. नंतर २०१६ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या वेळी करिश्माला तिच्या पतीकडून कोट्यवधी रुपये आणि मुलांचा ताबा मिळाला होता. तेव्हापासून करिश्मा सिंगल मदर बनून एकल आयुष्य जगत आहे. त्याचवेळी संजयने प्रिया सचदेवसोबत दुसरे लग्न केले आहे.
-
आमिर खानसोबत घटस्फोटानंतर त्याची पहिली पत्नी रीना दत्ताने एकटीने मुलांचं संगोपन केलं. तसेच तीने दुसरं लग्न देखील केलं नाही. तर, आमिरने किरण रावसोबत दुसरं लग्न केलं होतं. परंतु गेल्यावर्षी दोघांनी घटस्फोट घेतला.
-
मलायका अरोरा आणि अरबाज खानने घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका अर्जून कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
-
हृतिक रोशन आणि सुझैन खान काही वर्षांपूर्वी विभक्त झाले. त्यानंतर सुझैनच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. मात्र, तिने दुसरं लग्न केलं नाही.
-
मनिषा कोईरालाने सम्राट दहलसोबत लग्न केले होते. परंतु दोन वर्षातच दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मनिषाने लग्न केलं नाही.
-
अर्जुन रामपालने मे २०१८ मध्ये २१ वर्षांच्या लग्नानंतर पत्नी मेहर जेसियापासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून मेहर तिच्या दोन मुलींना सिंगल मदर म्हणून वाढवत आहे. दुसरीकडे अर्जुन गेल्या काही वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेची मॉडेल आणि अभिनेत्री गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. (फोटो सोशल मीडिया आणि इंडियन एक्सप्रेस)

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…