-
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा ‘अटॅक’ अॅक्शन-थ्रिलर हा चित्रपट १ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्य राज आनंद यांनी केले आहे. ‘अटॅक’ या चित्रपटात जॉनसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि रकुल प्रित सिंग झळकणार आहेत.
-
अभिनेता अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत कौर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘दसवी’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात अभिषेक बच्चन एका दहावी नापास असलेल्या नेत्याची भूमिका साकारत आहे. गंगाराम चौधरी असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार थलापति विजयचा ‘बीस्ट’ हा चित्रपट १३ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘बीस्ट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नेलसन दिलीप कुमार यांनी केले आहे. नेलसन यांनी स्वत: चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटात पूजा हेगडे विजयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
यंदाच्या वर्षीचा बहुचर्चित चित्रपट ‘KGF Chapter 2’ हा १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
गेल्या ३ वर्षांपासून प्रेक्षक दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. KGF प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाची प्रतिक्षा करत होते.
-
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे.
-
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा ‘जर्सी’ हा चित्रपट १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
-
शाहिदसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
-
शाहिदचा हा नवा चित्रपट ‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. विशेष म्हणजे या हिंदी रिमेकचं नावदेखील ‘जर्सी’च ठेवण्यात आलं आहे.
-
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित ‘रनवे ३४’ हा चित्रपट २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
‘रनवे ३४’ या चित्रपटाची कथा जेट एअरवेजच्या दोहा कोची फ्लाइटच्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. ‘रनवे ३४’ या चित्रपटाद्वारे अजय देवगण हा दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन त्याने स्वत: केली आहे. तो स्वतः यात मुख्य भूमिकेत दिसत आहे.
-
या चित्रपटात अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत सिंह, अंगिरा धर, बोमन इराणी आणि आकांक्षा सिंग हे कलाकार झळकणार आहे.
-
बॉलिवूडचा अॅक्शन हीरो टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती २’ हा चित्रपट २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात टायगर सोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री तारा सुतारिया दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे.
-
साबीर खान दिग्दर्शिक ‘हिरोपंती’ हा चित्रपट २०१४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातून अभिनेता टायगर श्रॉफने कलाविश्वात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातील अॅक्शन सीनमुळे चर्चेत राहिलेला टायगर लवकरच या चित्रपटाच्या सीक्वलमध्येही झळकणार आहे.

फुप्फुसांना चिकटलेली सगळी घाण लगेच होईल स्वच्छ; कफही नाही होणार, फक्त कोमट पाण्यात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या