-
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे दोघेही नेहमीच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट या ठिकाणी ते विवाहबंधनात अडकले.
-
कतरिना आणि विकी सध्या सिनेसृष्टीपासून दूर छान रोमँटिक सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.
-
कतरिनाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर विकीसोबत सुट्ट्या घालवतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
यातील एका फोटोत कतरिना आणि विकी हे दोघेही छान रोमँटिक पोझ देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत कतरिना ही सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
-
त्यानंतर कतरिनाने निसर्गरम्य वातावरणाचा सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा फोटो शेअर केला आहे.
-
फक्त कतरिनाने नव्हे तर विकीनेही त्यांच्या सुट्ट्यांचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोत विकी हा पाठ करुन उभा असून त्याच्या समोर छान समुद्र आणि बोट पाहायला मिळत आहे.
-
“या ठिकाणी कोणताही वायफाय नाही, त्यामुळे अजून चांगले कनेक्शन शोधत आहे”, असे कॅप्शन विकीने दिले आहे.
-
या फोटोंना चांगले लाइक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत.
-
दरम्यान त्या दोघांनीही ते नक्की कुठे फिरायला गेले आहेत, याचे ठिकाणी अद्याप सांगितलेले नाही.

उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी फडणवीसांची नवीन शक्कल; ८० टक्के मतदान केंद्रांवर…