-
मराठीतील आघाडी अभिनेत्री प्रिया बापट ही नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
-
प्रिया ही सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
-
नुकतंच प्रियाने डेनिम जॅकेट आणि जिन्समध्ये बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटचे अनेक फोटो प्रियाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
यातील एका फोटोत प्रियाने तिच्या डेनिम शर्टमधील फक्त एकच बटण लावले आहे. तर तिच्या जिन्सचे बटणही उघडे ठेवल्याचे दिसत आहे.
-
तर दुसऱ्या एका फोटोत प्रियाने उलट डेनिम शर्ट परिधान केला आहे. यात तिची पाठ पूर्णपणे उघडी दिसत आहे.
-
प्रियाच्या या बोल्ड फोटोशूटवर तिचे चाहते फिदा झाले आहेत. पण त्यासोबत या फोटोशूटमुळे तिला ट्रोलही केले जात आहे.
-
प्रियाच्या या फोटोशूटवर अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट पाहायला मिळत आहे.
-
‘तुम्ही तरी अशा पोस्ट टाकू नका, तू मराठी मुलगी आहेस, तुला असे कपडे चांगले वाटत नाही’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने ‘चांगलीच लाज सोडली फेमस होण्यासाठी’ असे म्हटले आहे.
-
‘तुझ्या साधेपणामुळेच मी तुझा फॅन होतो, पण हे बघून साधेपणाला घोडा लागलेला दिसतोय’, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.

“नेहरूंनी भारताला उभे केले, मनमोहन सिंग यांनी काम करायला लावले आणि मोदींनी…”, प्रसिद्ध डच लेखकाचे मोठे विधान