-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘देवमाणूस’ला ओळखले जाते.
-
‘देवमाणूस’ या मालिकेने ऑगस्ट २०२१ ला प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
त्यानंतर काही महिन्यांतच या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ही मालिका विविध रहस्यमयी घडामोडींमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.
-
या मालिकेच्या पहिल्या पर्वात अजितकुमारला लग्नाच्या मांडवातून दिव्या सिंगनं खेचून पोलिस स्टेशनला नेले होते.
-
त्यामुळे डिंपल आणि अजितचं लग्न काही होऊ शकलं नव्हतं. पण आता दुसऱ्या पर्वात त्या दोघांच्या लग्नाचा घाट घालण्यात आला होता.
-
त्या दोघांचं लग्न होणार की नाही याबद्दल चर्चा सुरु होत्या.
-
मात्र अखेर डिंपल आणि डॉ अजितकुमार देव या दोघांचे लग्न निर्विघ्न पार पडले आहे.
-
डिंपल आणि डॉ अजितकुमार देव या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोत डिंपल ही छान नटून थटून नववधूच्या वेशात दिसत आहे.
-
तर डॉ अजितकुमार देव यानेही छान सूट बूट घातल्याचे पाहायला मिळत आहे.
-
त्यांच्या लग्नानंतर आता मालिकेचा आणखी एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये डॉक्टर डिंपलला लग्नाचं गिफ्ट देणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
-
पण हे गिफ्ट नक्की काय? असणार याबद्दल अनेकांना उत्सुकता पाहायला मिळत आहे.

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश