-
बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो.
-
आमिर खान हा नेहमीच त्याच्या चित्रपटांसह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो.
-
आमिर खान हा नेहमी त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतो. तो अनेकदा त्यांच्यासोबतचे विविध फोटो पोस्ट करत असतो.
-
नुकतंच आमिर खानने त्याचा मुलगा आझादसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
यात आमिर हा त्याच्या लाडक्या मुलासोबत आंबा खाण्याची मजा लुटताना दिसत आहे.
-
सध्या आंब्याचा मोसम सुरु आहे. अशातच आमिर खाननेही त्याच्या मुलासोबत आंबा खाण्याचा आनंद लुटला आहे.
-
आमिरने शेअर केलेल्या या फोटोत तो आणि त्याचा मुलगा दिसत आहे. त्यांच्या समोर आंब्याने भरलेले ताट पाहायला मिळत आहे.
-
यानंतर दुसऱ्या फोटोत आमिर हा आंबा कापताना दिसत आहे. तर आणखी एका फोटोत ते दोघेही छान आंबे खाताना दिसत आहेत.
-
‘तुम्ही कधी तुमच्या कुटुंबासोबत असा आनंद लुटला आहे का?’, असा प्रश्न आमिर खानने या पोस्टला कॅप्शन देताना विचारला आहे.
-
दरम्यान त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे अनेक युजर्सने त्याच्या या प्रश्नाला उत्तरही दिले आहे.

Friendship Day 2025 : ‘फ्रेंडशिप डे’निमित्त दोस्तांना पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह WhatsApp, Facebook, Instagram वर पोहोचवा मैत्रीतील गोडवा