-
विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चंद्रमुखी या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वच चर्चेचा विषय ठरत आहेत. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
-
या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहे. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे.
-
येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार असला तरी आतापासूनच अनेक कलाकार त्याचे कौतुक करताना दिसत आहे.
-
नुकतंच अभिनेता रितेश देशमुख याने चंद्रमुखी या चित्रपटासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो.
-
रितेशने नुकतंच त्याच्या अधिकृत ट्विटरद्वारे या चित्रपटासाठी पोस्ट शेअर केली आहे.
-
या पोस्टमध्ये त्याने ‘चंद्रमुखी’ चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक शेअर केली आहे. त्याला कॅप्शन देताना तो म्हणाला, “विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित एक भव्य मराठी संगीतावर चंद्रमुखी चित्रपटाची निर्मिती झाली आहे. अजय अतुल यांची जोडी, प्रसाद ओक, अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांसारखे उत्कृष्ट कलाकारांनी साकारलेली ‘चंद्रमुखी’ तुमची मनं जिंकण्यासाठी येत आहे.”
-
रितेशची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. विशेष म्हणजे रितेश देशमुखच्या या पोस्टवर अमृता खानविलकरनेही कमेंट केली आहे.
-
“लय भारी सुपरस्टारची ही एक सुंदर प्रतिक्रिया आहे…मनापासून धन्यवाद”, असे अमृता खानविलकरने कमेंट करताना म्हटले आहे.
-
‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे.
-
तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.
-
‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली