-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी नुकतीच लग्नाची गाठ बांधली आहे.
-
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजेच ३ मे रोजी विराजस-शिवानी विवाहबंधनात अडकले.
-
लग्नानंतर नुकतंच त्या दोघांचा रिसेप्शन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
विराजस आणि शिवानीच्या रिसेप्शनला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
त्यांच्या लग्नाचे आणि रिसेप्शन सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या रिसेप्शनदरम्यान विराजस आणि शिवानीने मॅचिंग कपडे परिधान केले होते.
-
यावेळी शिवानीने छान गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
-
तर विराजसनेही तिच्या ड्रेसला मॅच होणारा सलवार कुर्ता परिधान केल्याचे पाहायला मिळत होते.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील विराजस आणि शिवानीच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.
-
त्यांनी या रिसेप्शनला हजेरी लावत विराजस आणि शिवानीला त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
त्यासोबतच अभिनेत्री श्रेया बुगडेही विराजस आणि शिवानीच्या रिसेप्शनला उपस्थित होती.
-
जानेवारी महिन्यात विराजस-शिवानीचा साखरपुडा पार पडला होता.
-
शिवानी आणि विराजस यांची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली होती.
-
‘डावीकडून चौथी बिल्डींग’ या विराजसच्या प्रायोगिक नाटकात शिवानीने काम केले होते.
-
विराजस आणि शिवानी गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

अनंत चतुर्दशीला बाप्पा ‘या’ राशींवर धरणार कृपेचं छत्र; मनाप्रमाणे गोष्टी घडण्यासह वैवाहिक जीवनात येईल सुख-शांती; वाचा राशिभविष्य