-
अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहे. अभिनेत्री दररोज तिच्या खास स्टाइलचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडेच अभिनेत्रीने साडीतील फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
पूजाकडे तिच्या वैयक्तिक वॉर्डरोबमध्ये कॉपी करण्यासारखे अप्रतिम कलेक्शन आहे. अलीकडेच तिने अशाच एका लूकने आपल्या फॉलोअर्सना खूश केले आहे.
-
अभिनेत्रीने नुकतीच हाताने पेंट केलेली रेशमी साडी परिधान केली आहे आणि स्लीव्हलेस ब्लाउजने तिच्या या लुकमध्ये चांगलीच भर घातली आहे.चला तर मग जाणून घेऊया या साडीबद्दल.
-
पूजाने गोल्डन फ्लोरल ब्लॉक प्रिंट आणि गोटा पट्टी एम्ब्रॉयडरी बॉर्डर असलेली क्रीम रंगाची जरी बुटी सिल्क साडी परिधान केली आहे. त्यासोबत या साडीला चमक देण्यासाठी क्रीम रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे. तुम्हालाही ही साडी विकत घ्याची असेल तर आधी या साडीची किंमत जाणून घ्या.
-
पूजा हेगडेची ही सुंदर साडी सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर आहे. कारण या साडीची किंमत १,०८,९९९ आहे. ही साडी अर्चना जेजू वेबसाइटवर उपलब्ध आहे.
-
पूजाने या साडीवर कुंदन डिझाईन असलेल्या बांगड्या, स्टेटमेंट रिंग्स, पीप-टो सँडल आणि सोन्याचे मोत्यांनी सजवलेले कुंदन कानातले घातले आहेत. पूजाची ही फॅशन स्टाइल सोशल मीडियावर खूप पसंत केली जात आहे. ( all photos: @hegdepooja/ instagram)

२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…