-    दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील टॉपचा कलाकार म्हणून रामचरणची ओळख आहे. 
-    राम चरण त्याच्या चित्रपटांसाठी कोट्यावधी रुपयांचं मानधन घेतोच. पण त्याचबरोबरीने त्याच्याकडे कोटी रुपयांची संपत्ती आहे. 
-    राम चरण राहत असलेल्या बंगल्याची किंमत जवळपास ३८ कोटी रुपये इतपत आहे. 
-    त्याचा हा बंगला हैद्राबादमधील सगळ्यात महागडा परिसर जुबली हिल्स या ठिकाणी आहे. 
-    शिवाय राम चरणने मुंबईमध्ये देखील महागडं घर खरेदी केलं आहे. 
-    हा सुप्रसिद्ध अभिनेता जवळपास १३०० कोटी रुपयांचा मालक आहे. 
-    राम चरणकडे Rolls Royce Phantom ही सगळ्यात महागडी कार आहे. त्याचबरोबरीने ब्रिटीश स्पोर्ट्स कार देखील तो वापरतो. बीएम डब्ल्यु, मर्सिडिज, रेंज रोव्हर सारख्या महागड्या कार देखील त्याच्याकडे आहेत. 
-    इतकंच नव्हे तर तो ट्रु जेट एअरलाइन्सचा देखील मालक आहे. 
-    भारतातील सगळ्यात महागड्या कलाकारांमध्ये राम चरणचाही समावेश आहे. ‘आरआरआर’ चित्रपटासाठीच त्याने ४५ कोटी रुपये इतपत मानधन घेतलं होतं. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम) 
 
  Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…” 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  