-
अभिनेत्री हृता दुर्गुळेने तिच्या दोन मराठी चित्रपटांची नुकतीच घोषणा केली आहे.
-
हृताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘अनन्या’ आणि ‘टाईमपास ३’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.
-
विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट येत्या जुलै महिन्यातच प्रदर्शित होतील.
-
हृताचा पती प्रतिक शहाने सोशल मीडियाद्वारे नव्या वाटचालीसाठी आपल्या बायकोला मन भरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
-
हृता देखील तिच्या चित्रपटांसाठी फारच उत्सुक आहे.
-
तसेच हृताने देखील एक खास पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की “माझ्या या सुंदर प्रवासामध्ये सगळ्यात आवडत्या व्यक्तीची मला साथ लाभत आहे.”
-
हृताची ही पोस्ट पाहून प्रतिक तिला तिच्या प्रत्येक कामात साथ देतो हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
‘अनन्या’ आणि ‘टाईमपास ३’ या दोन्ही चित्रपटात हृता वेगवेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.
-
‘अनन्या’ २२ जुलैला तर ‘टाईमपास ३’ २९ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होईल. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल