-
नामांकित रंगभूमी कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपट अभिनेते मकरंद देशपांडे हे नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात.
-
ते सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’ चित्रपटातही त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे कौतुक झाले होते.
-
तसेच अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत ‘द फेम गेम’ या वेबसीरिजमध्येही त्यांनी काम केले होते.
-
गेल्या काही दिवसांपासून मकरंद देशपांडे हे ‘बलात्कार प्लीज स्टॉप इट’ या नवीन नाटकामुळे चर्चेत आहे. हे नाटक बलात्कार याप्रकरणावर भाष्य करणारे आहे.
-
नुकतंच मकरंद देशपांडे यांनी दाक्षिणात्य विरुद्ध बॉलिवूड या वादावरही भाष्य केले आहे.
-
यावेळी मकरंद देशपांडे म्हणाले, “मी गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य विरुद्ध हिंदी सिनसृष्टी हा वाद बघत आहे. पण कधीतरी त्यांचा अहंकार देखील दुखावला गेला असावा असे मला वाटते.”
-
“एक काळ असा होता जेव्हा आपण दाक्षिणात्य कलाकारांबद्दल बोलायचो. त्यांना हिंदी येत नाही, त्यांना कोण पाहणार? पण चित्रपटाबद्दल आणि सिनेसृष्टीबद्दल असलेली मेहनत, कष्ट हे जास्त आहे”, असे मकरंद देशपांडे यांनी म्हटले.
-
“आपल्याकडे चित्रपटाचा नायक हा सर्व पैसे घेतो आणि त्या उलट तिकडे ती लोक चित्रपटावर जास्त पैसे खर्च करतात”, असेही ते म्हणाले.
-
“आता ‘बाहुबली’, ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ चॅप्टर 2’ यानंतर बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य कलाकारांना विचारण्यात आले नाही, तर त्यांना काहीही फरक पडत नाही”, असेही त्यांनी सांगितले.
-
“ते आता त्यांचे चित्रपट डब करु शकतात आणि जागतिक पातळीवरचे प्रेक्षक ते बघतो”, असेही त्यांनी म्हटले
-
“येत्या काही दिवसांत आता अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे कलाकार हे बॉलिवूड चित्रपटातही झळकताना दिसतील”, असेही मकरंद देशपांडे यांनी म्हटले.
-
(सर्व फोटो – मकरंद देशपांडे/ इन्स्टाग्राम)

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम