-
बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज दुसरी पुण्यतिथी आहे.
-
१४ जून २०२० रोजी सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
-
त्याचं असं अचानक निघून जाणं हा कुटुंबीय आणि चाहत्यांसाठी मोठा धक्काच होता.
-
सुशातंच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती.
-
छोट्या पडद्यावरून सुशांतने आपल्या कलाविश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली.
-
अल्पावधीतच अभिनय आणि टॅलेन्टच्या जोरावर त्याने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
२०१३ साली ‘काय पो छे’ सिनेमातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
त्यानंतर ‘एम.एस.धोनी – द अनटोल्ड स्टोरी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘छिछोरे’, ‘केदारनाथ’, ‘राबता’ अशा सुपरहिट चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
-
सुशातंच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासात त्याची नावे अनेक अभिनेत्रींसोबत जोडली गेली होती.
-
केवळ अंकिता आणि रियाच नाही तर इतर सहकलाकारांसोबतही सुशांतच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून सुशांत प्रसिद्धीझोतात आला.
-
मालिकेतील ‘मानव-अर्चना’ या पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
-
सुशांत मालिकेत ‘मानव’ हे पात्र साकारत होता.
-
तर अभिनेत्री अंकिता लोखंडे जैनने ‘अर्चना’ची भूमिका साकारली होती.
-
सुशांत-अंकिता अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. परंतु नंतर काही कारणांमुळे या दोघांचेही ब्रेक अप झाले.
-
‘राबता’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सहकलाकार असलेल्या अभिनेत्री क्रिती सेनॉनला सुशांत डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
परंतु, नंतर थोड्याच दिवसांत दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या.
-
‘केदारनाथ’ चित्रपटाद्वारे सुशांतच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
-
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने चित्रपटात सुशांतच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती.
-
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
-
सुशांतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती चर्चेत आली होती.
-
सुशांतच्या मृत्यू प्रकरणात रियाला अटकदेखील झाली होती.
-
सुशांत आणि रिया रिलेशनशिपमध्ये होते.
-
शिवाय ते लग्नदेखील करणार होते, अशा चर्चा रंगल्या होत्या. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस