-
अभिनेत्री राधिका आपटे हिने केवळ मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अगदी चित्रपटांपासून ते वेब सीरिज पर्यंत सर्वच बाबतीत राधिकानं स्वतःला या इंडस्ट्रीमध्ये सिद्ध केलं आहे.
-
काही चित्रपटातील बोल्ड भूमिकांमुळे ती बरेचदा चर्चेत असते. अनेकदा यावरुन तिला ट्रोलही करण्यात आलं आहे.
-
राधिका ही सध्या सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मात्र सिनेसृष्टीत येणाऱ्यासाठी तिला फार संघर्ष करावा लागला.
-
नुकतंच राधिकाने एका मुलाखतीदरम्यान सिनेसृष्टीतील एक विदारक सत्य सांगितले आहे.
-
राधिकाला अलिकडेच एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. तिला काही दिग्दर्शक निर्मात्यांनी विचित्र कारणे देत बऱ्याच चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता.
-
“काही दिवसांपूर्वीच मला एका चित्रपटासाठी नकार देण्यात आला. याचं कारण फार विचित्र होतं. अनेकदा माझी तुलना दुसऱ्या अभिनेत्रींसोबत केली जायची”, असे राधिका म्हणाली.
-
“तुझ्या तुलनेत त्या अभिनेत्रींची ओठ आणि छाती ही अधिक चांगली आहे. त्या तुझ्यापेक्षा जास्त आकर्षक आहेत आणि त्या फार काळ चालतील”, असे मला सांगण्यात आले.
-
“हा एक चांगला चित्रपट होता. जे व्यक्ती या चित्रपटाची निर्मिती करत होते, त्यांचा मी सन्मान करते. पण आपण ज्या गोष्टींचा विचार करतो, बघतो त्या तशा अजिबात नसतात. अनेकांची मानसिकता ही सारखीच असते”, असेही राधिकाने म्हटले.
-
“यामुळे मला आशा आहे की, अधिकाधिक स्त्रियांनी या क्षेत्रात आपले स्थान आणि अधिकारात बळकट करावेत. जेणेकरून अधिकाधिक गोष्टी बदलतील”, असेही राधिकाने सांगितले.
-
“जेव्हा मी या क्षेत्रात नवीन होते तेव्हा मला माझ्या शरीरयष्टीवर काम करण्याचा सतत सल्ला दिला जायचा. सुरुवातीला मला प्रचंड दबाव आला होता. अनेकांनी पहिल्याच भेटीमध्ये मला नाकाची सर्जरी कर”, असे सांगितले होते.
-
“तर दुसऱ्या भेटीत तुझ्या स्तनाची सर्जरी करुन घे”, असा सल्लाही मला दिला होता”, असा गौप्यस्फोट राधिकाने केला.
-
त्यापुढे ती म्हणाली, “हे सत्र आजही असंच पुढेही सुरु आहे. आजही कित्येक जण मला सर्जरी कर, असा सल्ला देतात. मी कित्येकदा तो ऐकला आहे.
-
“पण मला केसांना कलर करायलाच तीस वर्ष लागली. या गोष्टींसाठी मी साधं इंजेक्शन देखील घेणार नाही.” असे राधिका म्हणाली.
-
“मला या सगळ्या गोष्टी ऐकून खूप राग यायचा. पण यामुळेच मी माझ्या शरीरावर अधिकाधिक प्रेम करु लागले.” असे राधिका म्हणाली.
-
दरम्यान राधिका लवकरच ‘फॉरेंसिक’ या चित्रपटात झळकणार आहे. यात ती अभिनेता विक्रांत मेसीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

महिलांनो लघवी करताना ‘या’ चूका करू नका! मोजावी लागेल मोठी किंमत, दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा…