-
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि संजय दत्त लोकप्रिय अभिनेते आहेत. या दोघांमध्ये एक खास बॉन्डिंग आहे.
-
रणबीर कपूर आणि संजय दत्त या दोघांचा ‘शमशेरा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
रणबीर कपूरने याआधी संजय दत्तचा बायोपिक ‘संजू’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे रणबीरच्या करिअरला वेगळीच कलाटणी मिळाली.
-
राज कुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’मध्ये संजय दत्तच्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू मांडण्यात आल्या होत्या.
-
रणबीरने ही भूमिका फार उत्तम पद्धतीने साकारली होती. या भूमिकेबद्दल त्याचे फार कौतुकही झाले.
-
रणबीर हा सध्या त्याचा आगामी शमशेरा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण या दरम्यान त्याने संजय दत्तसोबतच्या बॉन्डिंगबद्दल खुलासा केला आहे.
-
“माझे आणि संजय दत्तचे नाते फारच खास आहे. २०१२ मध्ये मी बर्फी या चित्रपटात काम करत होतो, त्यावेळी ते माझ्यावर फार चिडले होते.”
-
संजय दत्तसोबतचा किस्सा सांगताना रणबीर म्हणाला, “जेव्हा मी बर्फी आणि रॉकस्टार या चित्रपटात काम करत होतो, त्यावेळी मी संजय दत्त यांच्या जिममध्ये वर्कआऊट करायचो.”
-
त्यावेळी तो मला म्हणाला, “तू इथे गेल्या दोन वर्षांपासून जिम करतोस. पण तुझ्या बॉडीमध्ये काही फरक होताना मला तरी दिसत नाही.”
-
“तू सध्या बर्फी चित्रपटात काम करतोस. मग तुझ्या आगामी चित्रपटाचे नाव काय असणार? पेढा की लाडू?”, असा शब्दात त्यांनी माझी खिल्लीही उडवली होता.
-
“त्यावेळी मला फार राग आला होता. पण त्यानंतर त्याने मला नीट समजावले. तसेच वाईट चित्रपटांची निवड न करता चांगल्या चित्रपटांची निवड करण्याचा सल्ला दिला होता.”
-
संजय दत्त हा माझ्यासाठी नेहमीच एक आधार आणि प्रेरणा देणारा व्यक्ती आहे. तो माझ्या वडिलांप्रमाणे आहे.
-
“त्याने नेहमी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. मी आतापर्यंत जे काही केले आहे, त्याचा त्याला खूप आनंद आणि अभिमान वाटतो”, असेही रणबीरने यावेळी सांगितले.
-
“संजय दत्तने मला नेहमीच वेगवेगळे चित्रपट करण्यास आणि प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारे चित्रपट करण्यास प्रेरणा दिली आहे”, असेही त्याने म्हटले.
-
“मला संजू सरांसारखा वडील मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे”, असेही रणबीर म्हणाला.
-
दरम्यान रणबीर कपूर त्याचा आगामी चित्रपट ‘शमशेरा’मध्ये पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तो या चित्रपट वडील आणि मुलगा अशा दोन्ही भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
या चित्रपटात संजय दत्त आणि रणबीर कपूर यांच्या व्यतिरिक्त वाणी कपूर, आशुतोष राणा, सौरभ शुक्ला, रोनित रॉय, त्रिधा चौधरी आणि पितोबाश त्रिपाठी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
-
करण मल्होत्रा दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २२ जुलैला हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल