-
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हे नाव कलाविश्वासाठी नवीन नाही. ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं.
-
करीनाने तिच्या कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक भूमिकाही स्विकारल्या आहेत. ती तिच्या चित्रपटासाठी फार मेहनत घेते.
-
बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि पती सैफ अली खान यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
-
करीना ही नेहमी फार बिनधास्तपणे तिचे मत व्यक्त करताना दिसते. ती सैफ अली खानचे आणि तिच्या मुलांबद्दल नेहमी काही ना काही तरी पोस्ट शेअर करत असते.
-
विशेष म्हणजे तैमुर आणि जेह याच्यासोबतच ती सारा आणि इब्राहिमची विशेष काळजी घेताना दिसते.
-
करीना आणि सैफ हा २०१२ मध्ये लग्नबंधनात अडकले होते.
-
करीनाने २०१६ मध्ये तैमूरला जन्म दिला होता.
-
तर २०२१ मध्ये तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्याचे नाव जहांगीर असे आहे.
-
तर सैफ अली खानला त्याची पहिली पत्नी अमृता सिंहपासून सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत.
-
सारा अली खान आणि जहांगीर यांच्यात २५ वर्षांचा फरक आहे.
-
सैफ अली खानला पहिल्या पत्नीपासून दोन आणि दुसऱ्या पत्नीपासून दोन अशी एकूण चार मुलं आहेत.
-
गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर ही पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
-
सध्या ती लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या सुट्ट्यांचे काही फोटो करीनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत असल्याने ती पुन्हा गरोदर असल्याचे बोललं जात आहे.
-
मात्र नुकतंच करीनाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
-
करीना कपूर ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे.
-
या फोटोत तिने ती पुन्हा गरोदर नसल्याचे स्पष्ट केले आहे.
-
“मी गरोदर नाही. हा सर्व पास्ता आणि वाईनचा परिणाम आहे” असे करीनाने म्हटले.
-
त्यापुढे ती म्हणाली, “सैफच्या मते त्याने आधीच देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी खूप योगदान दिले आहे.”
-
करीनाच्या या स्पष्टीकरणानंतर तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सुरु असलेल्या अफवा खोट्या असल्याचे समोर आलं आहे.
-
मात्र तिने सैफबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”