-
अभिनेते राजेश खन्ना हे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार होते.
-
राजेश खन्ना यांनी जे यश कमावलं तिथपर्यंत अद्याप कोणीच पोहोचलेलं नाही.
-
राजेश खन्ना यांच्यानंतर त्यांच्या मुलींनी देखील अभिनय क्षेत्रात करिअर केलं.
-
आता राजेश खन्ना यांची नात नाओमिका लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.
-
नाओमिका ही राजेश खन्ना यांची मोठी मुलगी रिंकी खन्नाची लेक आहे.
-
रिंकी खन्नाचं लग्न बिझनेसमन समीर सरनशी २००३ साली लग्न झालं होतं.
-
अलिकडेच ट्विंकल खन्नाने भाची नाओमिका आणि बहीण रिंकीचा फोटो शेअर केला होता.
-
ट्विंकल खन्नाने हा फोटो शेअर केल्यानंतर सर्वच तिच्या डोळ्यांची तुलना राजेश खन्ना यांच्याशी करत आहेत.
-
नाओमिका भारतात राहत नाही. ती सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.
-
नाओमिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत.
-
नाओमिकाचा आई रिंकी खन्नानं अवघी ५ वर्षंच बॉलिवूडमध्ये करिअर केलं. तिने ‘प्यार में कभी कभी’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं.
-
रिंकी खन्नाने ‘मुझे कुछ कहना है’, ‘जिस देश में गंगा रहता है’, आणि ‘झंकार बीट्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (फोटो- नाओमिका सरन इन्स्टाग्राम)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक