-
अभिनेते मकरंद अनासपुरे जवळपास सात ते आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘दे धक्का २’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
-
या चित्रपटानिमित्त त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती.
-
यावेळी त्यांना तुम्ही आता विनोदी भूमिका रुपेरी पडद्यावर साकारताना दिसत नाही. यामागचं कारण काय? असा प्रश्न विचारण्यात आला.
-
यावेळी त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं.
-
मकरंद म्हणाले, “एका टप्प्यावर प्रेक्षकांना तुमच्या भूमिकांचा कंटाळा येऊ लागतो. तसेच स्वतःलाही आपल्याच भूमिकांचा कंटाळा येतो. अशी अवस्था नटाच्या आयुष्यामध्ये येते.”
-
“मग अशावेळी काही काळ थांबायचं असतं. मध्यंतरीच्या काळामध्ये मी आमच्या नाम फाऊंडेशनच्या कामामध्ये रमलो होतो. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर माझा ‘दे धक्का २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.”
-
“सात ते आठ वर्षानंतर पुन्हा स्वतःला शोधणं ही नवी गंमत असते. त्यामुळे आता विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका मी साकारत आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना आपल्याला मी पुन्हा येईन असं म्हणावंच लागतं.”
-
चित्रपटांसह ‘रानबाजार’ सारख्या वेबसीरिजमध्येही मकरंद अनासपुरे यांनी काम केलं.

Maharashtra Monsoon Updates : मान्सूनचा प्रवास आजपासून रखडणार! इंग्लंडमधील हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण…