-
अंकिता लोखंडे आणि विकी जैन आपले वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत.
-
अंकिता तिचे आणि पती विकी जैनचे अनेक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते.
-
दोघांच्या लग्नाला ६ महिन्यांहून अधिक काळ झाला असून नुकत्याच समोर आलेल्या नवीन फोटोंवरून अंकिता गरोदर असल्याची चर्चा रंगली आहे.
-
अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पती विकी जैनसोबत दिसत आहे.
-
निळ्या रंगाच्या साइट कट ड्रेसमध्ये अंकिता नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.
-
अंकिता आणि विकी रोमँटिक स्टाईलमध्ये कॅमेरासमोर पोज देत आहेत.
-
ही छायाचित्रे शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तू जसा आहेस, जसा होतास आणि जसा असशील, मी तुझ्यावर प्रेम करते.”
-
हे फोटो पाहून काही लोक या जोडप्याचे कौतुक करत असतानाच काही सोशल मीडिया यूजर्सनी अंकिता प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला आहे.
-
युजर्सचं असं म्हणणं आहे की, या फोटोंमध्ये अंकिटाचे पोट पुढे आलेले दिसत आहे, तसेच विकीही तिच्या पोटाला आधार देत पोज करत आहे.
-
सर्वजण अंकिताच्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा करत आहेत. मात्र, प्रेग्नेंसीच्या वृत्तावर अंकिताने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
-
एका युजरने लिहिले की, “ती १००% प्रेग्नंट आहे.” त्याच वेळी, इतर वापरकर्त्यांनी देखील कमेंट सेक्शनमध्ये तिच्या गरोदरपणाबाबत प्रश्न विचारले आहेत.
-
दरम्यान, अंकिताच्या गरोदरपणाची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
-
यापूर्वी, जेव्हा अंकिताने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर तिच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फोटो शेअर केले होते, तेव्हाही ती गरोदर असल्याचा अंदाज लावला जात होता.
-
मात्र, यासंबंधी अद्याप अंकिता आणि विकीच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेले नाही.
-
सर्व फोटो : अंकिता लोखंडे/ इन्स्टाग्राम

Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…