-  
  झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ शोला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
 -  
  कलाविश्वाप्रमाणेच इतर क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या महिलांना सुबोध भावे आणि कार्यक्रमातील महिलावर्ग मिळून बोलतं करतात.
 -  
  नुकतंच ‘बस बाई बस’ शोमध्ये लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने हजेरी लावली.
 -  
  पूजाने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिचा ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
 -  
  ‘बस बाई बस’ शोमध्ये पूजाने अगदी दिलखुलासपणे सगळ्याच प्रश्नांना उत्तरे दिली.
 -  
  या शोमध्ये विविध खेळ खेळले जातात. शोमधील एका खेळात सहभागी झालेल्या सेलिब्रिटीला फोटो दाखवला जातो.
 -  
  फोटोतील व्यक्ती आपला सहप्रवासी आहे, असं समजून प्रवासादरम्यान त्याच्याशी गप्पा मारायच्या असतात.
 -  
  पूजाला शोमध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा फोटो दाखवण्यात आला.
 -  
  फोटो पाहताच पूजा गालातल्या गालात खुदकन हसून थोडीशी लाजली, हे पाहून सगळेच अवाक झाले.
 -  
  प्रवासात सहप्रवासी असलेल्या सिद्धार्थशी पूजाने गप्पा मारत तिच्या मनातील भावनाही बोलून दाखवल्या.
 -  
  पूजा म्हणाली, “तुझ्यावर माझा खूप मोठा क्रश आहे. सिद्धार्थ तू खूप छान आणि हॉट आहेस”.
 -  
  पुढे ती म्हणाली, “घरी मला सगळे तुझ्या नावाने चिडवतात. कारण, मला लग्न करायचं असेल तर मी तुझ्याशी करेन हे सगळ्यांना माहीत आहे”.
 -  
  “तुझ्याशी लग्न झालं तर मला नक्कीच आवडेल”, असं पूजाने म्हणताच एकच हशा पिकला.
 -  
  ‘बस बाई बस’ शोमधील पूजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (सर्व फोटो : झी मराठी, पूजा सावंत/ सोशल मीडिया )
 
  भारतातील IT क्षेत्र चिंतेत; अमेरिकेत आउटसोर्सिंगविरोधात विधेयक सादर, लाखो नोकऱ्या जाण्याची भीती