-
मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री पूजा सावंतच्या नावाचाही समावेश होतो.
-
सध्या पूजा ‘दगडी चाळ २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
गेले अनेक दिवस या चित्रपटाचे कलाकार प्रमोशनमध्ये व्यग्र असलेले दिसून आले.
-
पूजाने चित्रपटाच्या प्रमोशनकरिता पारंपारिक पोशाखाला प्राधान्य दिल्याचे दिसुन आले.
-
बहुतांश प्रमोशनच्या कार्यक्रमांना पूजाने साडीमध्ये हजेरी लावली. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
साडीमध्ये कोणत्याही स्त्रीचे सौंदर्य आणखी खुलते. पूजादेखील या सर्व फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
-
‘दगडी चाळ २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
-
सध्या ‘दगडी चाळ २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे. बॉलिवूड चित्रपटांकडे पाठ फिरवत आता प्रेक्षक मराठी चित्रपटांना प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे.
-
‘दगडी चाळ २’ ३५० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. दहीहंडीच्या शुभ मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अवघ्या ३ दिवसांमध्येच चित्रपटाने दोन कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.
-
चित्रपटाला मिळणाऱ्या भरगोस प्रतिसादाने बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आणखी यशस्वी होणार हे चित्र स्पष्ट आहे.
-
त्यामुळे चित्रपटातील कलाकार याबाबत आनंदी असुन सोशल मीडियाद्वारे त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले.
-
पूजाने प्रमोशन दरम्यानच्या या खास लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (सर्व फोटो : पूजा सावंत, Daagdi Chaawl 2/ इन्स्टाग्राम)

भारतातील IT क्षेत्र चिंतेत; अमेरिकेत आउटसोर्सिंगविरोधात विधेयक सादर, लाखो नोकऱ्या जाण्याची भीती