-
दंगल –
कुस्तीपटू गीता फोगाट हिच्या जीवनावर हा चित्रपट आधारीत आहे. -
आमिर खानसोबतच अभिनेत्री फातिमा सना शेख आणि अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या.
-
83 –
भारतीय क्रिकेट संघाने 1983 साली जिंकलेल्या वर्ल्डकपवर हा चित्रपट आधारित आहे. हा क्रिकेटर कपिल देव यांचा बायोपिक आहे. -
यात अभिनेता रणवीर सिंग हा कपिल देव यांच्या भूमिकेत असून अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
-
भाग मिल्खा भाग –
धावपटू मिल्खा सिंग यांचा हा जीवनपट आहे. -
यात अभिनेता फरहान अख्तर व सोनम कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
-
मेरी कोम –
बॉक्सर मेरी कोम हिचा हा बायोपिक आहे. -
अभिनेत्री प्रियांका चोप्राने यात मेरी कोमची भूमिका साकारली आहे.
-
एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी –
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. -
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”