-
गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण वर्षभर वाट पहात असतो. त्याच्या आगमनाने संपूर्ण आसमंत भारुन जातो.
-
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेत बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होणार आहे.
-
कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बाप्पाचा आगमन सोहळा करणार आहेत.
-
कानेटकर कुटुंबात प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरे केले जातात.
-
यंदा बाप्पाच्या उत्सवासाठी पर्यावरण पुरक मूर्ती तर असणारच आहे, यासोबतच बाप्पाचा देखावाही घरातल्याच वस्तूंपासून बनवण्यात आला आहे.
-
अप्पू, शशांक आणि कुक्की गँगने एकत्र येऊन बाप्पाच्या सजावटीसाठी वाड्याचीच प्रतिकृती तयार केली आहे आणि तेही टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर करत.
-
कानेटकर कुटुंबात सुग्रास नैवेद्याची रेलचेल असेलच. पण सोबतीला भजनाचा खास कार्यक्रम देखिल रंगणार आहे.
-
संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत सण साजरे करण्यात खरा आनंद दडलेला असतो.
-
ठिपक्यांची रांगोळी ही मालिका आणि यातील प्रत्येक पात्र म्हणूनच प्रेक्षकांच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग बनली आहे.

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश