-
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या याच जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला ठिकठिकाणी निरोप दिला जात आहे.
-
गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा भक्तीपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे.
-
गणपती बाप्पाला निरोप देताना सर्वच गणेशभक्तांचे डोळे पाणावले आहेत. यात सर्वसामान्यांपासून कलाकारांचाही समावेश आहे.
-
मराठीतील अनेक कलाकार आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
-
त्यांनी याबाबत पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणजेच हार्दिक जोशी याने अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.
-
हार्दिक जोशीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
-
या पोस्टमध्ये त्याने त्याच्या घरातल्या आणि सार्वजनिक बाप्पाच्या दर्शन घेतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. याला त्याने फारच हटके कॅप्शन दिले आहे.
-
“गणपती चालले गावाला…चैन पडेना आम्हाला. बोला गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या !!” असे कॅप्शन हार्दिक जोशीने दिले आहे.

“देव माफ करेल कर्म नाही” सापाला अक्षरश: जाळून टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक