-
१९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटामुळे अभिनेत्री मंदाकिनी रातोरात स्टार झाल्या होत्या.
-
या चित्रपटात मंदाकिनी यांचा बोल्डनेस पाहून प्रेक्षक हैराण झाले होते.
-
राज कपूर दिग्दर्शित या चित्रपटात मंदाकिनी यांनी राजीव कपूरबरोबर महत्वाची भूमिका साकारली होती.
-
या चित्रपटात त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांनी दिलेल्या बोल्ड सीन्सचीच चर्चा अधिक रंगली होती.
-
मात्र त्यानंतर त्या फारशा चित्रपटात झळकल्या नाहीत. यानंतर त्यांनी आता एका मुलाखतीत त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत महिलांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल वाचा फोडली आहे.
-
मंदाकिनी यांनी १९८५ साली ‘मेरे साथी’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.
-
या चित्रपटापेक्षा त्यांचे नाव दुसऱ्या म्हणजेच ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटामुळे चर्चेत आलं होतं.
-
मंदाकिनी यांनी ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीबद्दल खंत व्यक्त केली.
-
यात त्या म्हणाल्या, “आमच्या काळात हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्रींवर फार कमी लक्ष दिले जायचे.”
-
“मी जेव्हा चित्रपट करण्यास सुरुवात केली तेव्हा मला अनेक चित्रपटांची ऑफर मिळाली.”
-
“पण त्यावेळी मी असे काही चित्रपट केले जे मला करायला नको हवे होते.”
-
“मी जेव्हा चित्रपट साइन करण्यास सुरुवात केली तेव्हा सर्व दिग्दर्शक माझ्याकडे चित्रपट घेऊन यायचे.”
-
“त्यामुळे मी सर्वच चित्रपट साइन केले.”
-
“पण यामुळे असं झालं की मला जे चित्रपट नाकारायला हवे होते ते देखील मला करावे लागले”, असा खुलासा तिने केला.
-
दरम्यान मंदाकिनी २६ वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. लवकरच त्या ‘माँ ओ माँ’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘या’ भयंकर आजारानं शिरीष गवसचा मृत्यू; सुरुवातीलाच दिसतात ६ जीवघेणी लक्षणे, दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या