-  
  प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचं आज २१ सप्टेंबर २०२२ रोजी उपचारादरम्यान निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते.
 -  
  गेली अनेक वर्षे ते कॉमेडी करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते.
 -  
  राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हापासून गेले ४० दिवस त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते.
 -  
  तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या उपचारांना यश आलं नाही आणि आज सकाळी राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालवली.
 -  
  राजू श्रीवास्तव यांचं पत्नी, मुलगा आणि मुलगी असं चौकौनी कुटुंब आहे. आज आपण त्यांची मुलगी अंतरा श्रीवास्तव हिच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
 -  
  राजू श्रीवास्तव यांच्या मुलीबद्दल फारसं कुणाला माहीत नसेल. पण अंतरा श्रीवास्तव ही चित्रपट इंडस्ट्रीत कार्यरत आहे.
 -  
  तिने अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माती म्हणून काम केलंय.
 -  
  मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंतरा २८ वर्षांची असून तिचे लग्न झालेले नाही.अंतराचा जन्म २० जुलै १९९४ रोजी मुंबईत झाल्याचे सांगितले जाते.
 -  
  अंतराने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलमधून केले आहे. तसेच मुंबईतील एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून मास मीडिया इन अॅडवर्टायझिंगमध्ये डिग्री पूर्ण केली.
 -  
  २००६ मध्ये अंतराला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय ब्रेव्हरी पुरस्कार देण्यात आला होता. तिने आपल्या आईला तिच्या घरात घुसलेल्या दोन चोरांपासून वाचवले होते, त्या घटनेबद्दल तिला हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी अंतरा फक्त १२ वर्षांची होती.
 -  
  एकदा बोलताना अंतराने या घटनेचा उल्लेख केला होता. तेव्हा तिने सांगितले होते की त्या चोरांकडे बंदुका होत्या, त्यामुळे तिला फक्त त्यांच्या आईला वाचवायचं होतं. अंतराने बेडरूममध्ये जाऊन वडिलांना आणि पोलिसांना मदतीसाठी बोलावले. यानंतर खोलीच्या खिडकीतून इमारतीच्या चौकीदाराला आवाज दिला. चौकीदार आणि पोलिसांनी येऊन तिच्या आईची गुंडांपासून सुटका केली होती. “या 10 मिनिटांच्या घटनेने मला पूर्णपणे बदलून टाकले,” असं अंतरा म्हणाली.
 -  
  २०१३ मध्ये, अंतराने फ्लाइंग ड्रीम एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड साठी सहाय्यक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तिने मॅक प्रॉडक्शनसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले.
 -  
  तिने सहाय्यक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून ‘फुल्लू’, ‘पलटन’, ‘द जॉब’, ‘पटाखा’ आणि ‘स्पीड डायल’ सारखे चित्रपट केले आहेत.
 -  
  पलटन चित्रपटाच्या निर्मात्यांच्या टीममध्ये अंतरा होती.
 -  
  २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘वोडका डायरीज’ या चित्रपटातून अंतराने अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.
 -  
  कल्की कोचलिनची मुख्य भूमिका असलेल्या द जॉब चित्रपटाचे कॉस्च्युम डिझाईन अंतराने केले होते
 -  
  (अंतराचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून साभार, तर राजू श्रीवास्तव यांचे फोटो संग्रहित)
 -  
  हेही वाचा – ड्रग्ज, सायकल चोरी अन्…; ‘या’ बिग बॉस स्पर्धकांना खऱ्या आयुष्यात जावं लागलं तुरुंगात
 
  India vs South Africa Women’s World Cup 2025 Final: पहिल्या जगज्जेतेपदाला गवसणी, भारताच्या लेकींनी करून दाखवलं; विश्वचषकावर कोरलं सुवर्णाक्षरांनी नाव!