-
अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘राम सेतु’ हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा ही एका आर्कियोलॉजिस्टवर आधारित आहे. भारत-श्रीलंकाच्यामध्ये असलेल्या राम सेतुभोवती या चित्रपटाची कथा फिरते.
-
अक्षयच्या ‘राम सेतु’बरोबरच अजय देवगणचा ‘थॅंक गॉड’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हा चित्रपटही २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.
-
या चित्रपटाचं दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून हा एक विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
-
या दिवाळीत २५ ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
तर अभिनेता शरद केळकर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहे. पावनखिंडीतील थरार या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे
-
हिंदी आणि मराठीबरोबरच साऊथचे अनेक मोठे चित्रपट या दिवाळीत येणार आहेत. अभिनेता कार्तीचा ‘सरदार’ हा चित्रपट २१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तामिळनाडू बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची ‘प्रिन्स’शी टक्कर होणार आहे.
-
शिवकार्तिकेयन स्टारर ‘प्रिन्स’ दिवाळी वीकेंडला येणार आहे. हा चित्रपट २१ ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
-
विश्व मंचूचा तेलुगू हॉरर कॉमेडी चित्रपट ‘गिन्ना’ 21 ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाची टक्कर ‘उरी देवुदा’सोबत होईल.
-
विश्वक सेन आणि मिथिला पालकर यांचा ‘उरी देवुडा’ हा चित्रपट २१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हा एक तेलुगु चित्रपट आहे.

Rishabh Pant Injury: ऋषभ पंतला मैदानात दुखापत, डाव्या पायातून आलं रक्त; रिटायर्ड हर्ट होत गेला बाहेर; नेमकं काय घडलं?