-
झी वाहिनी सातत्याने आपल्या प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका घेऊन येत असते. अल्पवधीतच लोकप्रिय मालिका ठरली ती म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’.
-
या मालिकेतील कलाकारांनी आज डोंबिवली येथील फडके रोडवर एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
झी मराठी अवार्ड्स २०२२ मध्ये ‘नवा गडी नवं राज्य’ ला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
-
‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेची खासियत म्हणजे याची निर्मिती अभिनेत्री श्रुती मराठे हिने केली आहे. श्रुतीसह तिचा पती गौरव घाटणेकर सुद्धा या मालिकेचा निर्माता आहे.
-
झी मराठी अवार्ड्स २०२२ मध्ये अभिनेत्री पल्लवी पाटीलला विशेष लक्षवेधी पुरस्कार मिळाला आहे.
-
तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
अभिनेत्री श्रुती मराठे ही कायम तिच्या लुक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
श्रुती मालिका चित्रपटांच्याबरोबरीने जाहिरातीदेखील काम करते.
-
श्रुतीनेदेखील ‘राधा ही बावरी’, ‘जागो मोहन प्यारे’ यांसारख्या मालिकांमधून काम केले आहे.
-
तिने दाक्षिणात्य चित्रपटातसुद्धा अत्यंत बोल्ड अशा भूमिका केल्या आहेत.
-
या कार्यक्रमात कलाकारांनी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांबरोबर एक सेल्फी घेतला आहे. या कार्यक्रमाला अनेक तरुण तरुणी उपस्थित होते. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
