-
बॉलिवूडकरांबरोबरच मराठी कलाकारांनीही यंदाची दिवाळी धूम धडाक्यात साजरी केली. कित्येकांनी स्वतःच्या घरी खासगी पार्टी आयोजित केली होती. मराठीतील सर्वात गोड जोडपं म्हणून ज्यांची चर्चा होते त्या मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनीही त्यांच्या घरी एक मस्त पार्टी आयोजित केली होती.
-
मितालीने या पार्टीतील काही खास फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले.
-
या पार्टीत मराठी मनोरंजनसृष्टीतील बऱ्याच मंडळींनी हजेरी लावली.
-
गौरी नलावडेबरोबर या दोघांनी खूप धमाल केली, हा फोटो गौरीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केला.
-
मितालीच्या या पार्टीतील फोटोंची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
-
मित्र मैत्रिणींबरोबर त्यांनी अतिशय थाटात दिवाळी साजरी केली.
-
पूजा सावंत, गायत्री दातार यांनीदेखील या पार्टीत हजेरी लावून आणखी रंगत आणली.
-
यांच्याबरोबरीनेच ओंकार राऊत, हेमंत ढोमे, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, इषा केसकर, क्षिति जोग हे कलाकारही या पार्टीत हजर होते.
-
सिद्धार्थ आणि मितालीचं आदरतिथ्य सगळ्यांना प्रचंड आवडलं. (फोटो सौजन्य : मिताली मयेकर / इन्स्टाग्राम)

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर पंतप्रधान मोदींचं अर्थव्यवस्थेबाबत मोठं विधान; म्हणाले, “आता फक्त स्वदेशी…”