-
बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीचा जन्म हैदराबादमध्ये २८ ऑक्टोबर १९८६ मध्ये झाला होता.
-
अदितीचे वडिल बोहरा मुस्लीम तर तिची आई हिंदू आहे आणि अदिती मोहम्मद सालेह अकबर हैदरी आणि जे रामेश्वर राव या शाही कुटुंबांतील आहे.
-
अदितीला नेहमीच डान्सची आवड होती. तिने भरतनाट्यम डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली.
-
वयाच्या ११ व्या वर्षापासून अदिती डान्स करतेय आणि लीला सॅमसन डान्स ग्रुपचा भाग राहिली आहे.
-
अदिती तिच्या डान्स करिअरच्या निमित्ताने अनेकदा परदेशात प्रवास करत असे. त्यावेळी तिची ओळख मनोरंजन विश्वातील काही लोकांशी झाली होती.
-
अदितीच्या लुक आणि ड्रेसिंग सेन्स पाहून तिला हळूहळू मॉडेलिंगच्या ऑफर मिळू लागल्या होत्या.
-
अदितीने २००४ मध्ये ‘श्रीनगरम’मध्ये पहिल्यांदा अभिनय केला होता. त्यात तिने १९ व्या शतकातील देवदासीची भूमिका साकारली होती.
-
अदितीने अभिनय केलेल्या या तमिळ चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते आणि इथूनच तिच्या अभिनय करिअरची सुरुवात झाली.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काही चित्रपट केल्यानंतर राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी २००९ मध्ये ‘दिल्ली ६’ मध्ये संधी दिली.
-
या चित्रपटाने अदिती राव हैदरीला बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने काही अनेक हिंदी चित्रपटांत काम केलं.
-
‘धोबी घाट’, ‘ये साली जिंदगी’, ‘रॉक स्टार’, ‘लंदन, पेरिस, न्यूयॉर्क’, ‘मर्डर 3’, ‘वजीर’, ‘फितूर’, ‘पद्मावत’ या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या.
-
अदिती राव हैदरी वयाच्या १७ वर्षी वकील सत्यदीप मिश्राच्या प्रेमात पडली होती. २१ व्या वर्षी तिने लग्न केलं होतं.
-
पण अदिती आणि सत्यदीप यांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांमध्ये सातत्याने वाद होऊ लागले.
-
काही रिपोर्ट्सनुसार २५ व्या वर्षी अदितीने सत्यदीप मिश्रापासून घटस्फोट घेतला.
-
मात्र अदितीने बॉलिवूडमध्ये आल्यानंतर करिअरसाठी लग्न आणि घटस्फोट या सर्व गोष्टी लपवल्या होत्या. (फोटो साभार- अदिती राव हैदरी इन्स्टाग्राम)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या