-
नुकतंच महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. अत्यंत थाटात हा सोहळा पार पडला. चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येक पात्राची ओळखही करून देण्यात आली.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा भव्य सोहळा पार पडला.
-
मुख्यमंत्र्यांबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.
-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटातून मराठीत पदार्पण करणार आहे.
-
या चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयच्या निवडीवरुन सध्या सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत, पण एकूणच अक्षयचा हा लूक प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला आहे.
-
काही दिवसांपूर्वी आपण मराठी अभिनेता सुबोध भावेलाही ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महजाराजांच्या भूमिकेत पाहिलं.
-
महाराजांची भूमिका वर्षानुवर्षे छोट्या पडद्यावर साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांनीदेखील ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर महाराजांची भूमिका साकारली. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.
-
पण प्रेक्षकांनी प्रत्येकवेळी अभिनेता शरद केळकरने साकारलेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेची आठवण काढली.
-
महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर उत्तम दिसतात असं मत कित्येक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर मांडलं.
-
दाक्षिणात्य अभिनेता आर. माधवन यानेसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी लूक टेस्ट दिली होती ही गोष्ट फारशी कुणाला ठाऊक नाही.
-
माधवनचा साधेपणा, आणि त्याच्या अभिनयातील सहजता आजही लोकांना प्रचंड भावते.
-
मध्यंतरी माधवनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून त्याला आजवर न साकारता आलेल्या भूमिकांच्या लूक टेस्टचे फोटो शेअर केले होते. या पोस्टमध्ये त्याने आजवर दिलेल्या लूक टेस्ट आणि पदरी न पडलेल्या भूमिकांची माहिती लोकांना दिली होती.
-
त्यातील पहिल्याच फोटोमध्ये माधवन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसत होता. कोणत्या चित्रपटासाठी माधवनने ही लूक टेस्ट दिली होती ते आजवर स्पष्ट झालं नाही, पण महाराजांच्या भूमिकेत माधवन अगदी हुबेहूब त्यांच्यासारखाच दिसत होता आणि त्याचा हा लूक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता. त्याला ही भूमिका साकारता न आल्याची खंत त्याने या पोस्टमध्ये व्यक्त केली होती.
-
याचवर्षी माधवनच्या ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला.
-
या चित्रपटात माधवनने इस्रोचे महान वैज्ञानिक नंबी नारायणन यांची भूमिका वठवली. या चित्रपटातून त्याने नंबी यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आणि भारतीय विज्ञान क्षेत्रात त्यांचं योगदान अनमोल आहे हे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडलं. अभिनयाबरोबरच या चित्रपटाचं दिग्दर्शनही स्वतः माधवनने केलं होतं. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली