-
मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते.
-
ऋतुजा बागवे हिने कलाविश्वात अप्लावधीतच स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
नाटक, मालिका, चित्रपटांतून अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
-
मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत तिने ‘अनन्या’ नाटकातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
‘अनन्या’ या नाटकातील ऋतुजाने साकारलेली दिव्यांग मुलीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
-
दिव्यांग मुलीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ती रोज अनेक तास सराव करायची.
-
या नाटकासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली होती.
-
ऋतुजाला या नाटकासाठी अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. या नाटकाचे प्रयोग परदेशातदेखील झाले आहेत.
-
प्रताप फड यांनी या कलाकृतिचे दिग्दर्शन केले आहे.
-
एकांकिका, नाटक, चित्रपट असा अनन्या या कलाकृतीचा प्रवास आहे
-
नाटकाच्या बरोबरीने ‘नांदा सौख्य भरे’, ‘तू माझा सांगाती’, ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमधून तिने काम केले आहे.
-
नुकतंच तिने स्वत:चं नवीन घर खरेदी केलं आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग