-
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आई-बाबा झाले आहेत. ६ नोव्हेंबर रोजी आलिया-रणबीरला कन्यारत्न प्राप्त झाले, यामुळे कपूर कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
-
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांनी लवकरच आई बाबा होणार असल्याची बातमी सोशल मीडियाद्वारे सर्वांना दिली.
-
गरोदरपणातदेखील आलिया ने कामातून ब्रेक न घेता शूटिंग सुरू ठेवले होते.
-
यादरम्यान आलियाच्या प्रेग्नेंसी फॅशनची सर्वत्र चर्चा होत होती.
-
आलियाचा गरोदरपणातील प्रत्येक लूक आकर्षक होता.
-
प्रत्येक वेळी आलियाने लूकमध्ये काही हटके प्रयोग केले असल्याचे दिसून आले.
-
याच काळात आलियाने ‘ED-A-Mamma’ ही मॅटर्निटी फॅशन रेंज लाँच केली.
-
यामागचा उद्देश गरोदर स्त्रियांना त्यांना आवडतील असे, आरामदायी कपडे फॅशनशी तडजोड न करता निवडता यावे हा होता.
-
‘ED-A-Mamma’ साठी केलेल्या शूटचे फोटो देखील आलियाने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
-
मागच्या महिन्यात आलियाचे कुटुंबातील व्यक्तींच्या उपस्थितीत डोहाळेजेवण करण्यात आले. याचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले होते.
-
“मुलगी झाली तर तिचे नाव ‘आयरा’ असे ठेऊ, कारण त्यात रणबीरचा ‘रा’ आणि आलियाचा ‘आ’ आहे. त्यामुळे आयरा हे नाव मला खूप आवडते आणि मुलगी झाली तर तिचे हे नाव ठेऊ”, असे आलियाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.
-
आलिया भट्ट आणि रणबीरच्या मुलीला पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान गरोदर असताना आलियाने केलेल्या मॅटरनीटी फॅशनचे फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली