-
अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या बॉलिवूड पदार्पणाला नुकतीच १५ वर्ष झाली. शाहरुख खानबरोबर ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं.
-
पण त्याआधी ती संगीतकार हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा’ या अल्बममध्ये झळकली होती.
-
तसेच बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिने ‘ऐश्वर्या’ या २००६ साली प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक इंद्रजीत लंकेश यांच्या कन्नड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.
-
आज दीपिका बॉलिवूडमधील हाय पेड अॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते.
-
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी दीपिकाने मॉडेलिंग क्षेत्रातही नाव कमावले होते. २००५ मध्ये तिने किंगफिशर मॉडेल ऑफ द इयर हे टायटल मिळवले.
-
‘ओम शांती ओम’नंतर तिला एक वेगळी ओळख मिळाली.
-
१५ वर्षांच्या करिअरमध्ये दीपिकाने ३२ हून अधिक चित्रपटात काम केले आहे.
-
बॉलिवूडमध्ये काम करतानाच तिने ‘ट्रिपल एक्स’ या हॉलिवूड चित्रपटातही मुख्य भूमिका साकारली आहे.
-
दीपिका तिच्या करिअरमध्ये २० हून जास्त ब्रँड्स ला एंडॉर्स केले आहे. फक्त भारतीय नाही तर आंतरराष्ट्रीय ब्रॅंडसनेही दीपिकाला त्यांची अॅंबेसिडर म्हणून जाहीर केले आहे.
-
फ्रान्सच्या लुईस व्हुइटन या फॅशन ब्रँडची दीपिका पहिली भारतीय अॅंबेसिडर आहे.
-
आता आगामी काळात दीपिका ‘सर्कस’, ‘पठाण’, ‘प्रोजेक्ट के’, ‘जवान’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्याला दिसणार आहे.
-
आजच्या घडीला ३०० हून अधिक कोटी तिची संपत्ती आहे.
(सर्व फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण/ इन्स्टाग्राम)

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा