-
कपूर कुटुंबाचा भारतीय चित्रपटसृष्टीत खूप आधीपासून दबदबा आहे. पृथ्वी राज कपूरपासून ते रणबीर कपूरपर्यंत, या कुटुंबाने बॉलिवूडला अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. (फोटो: करीना कपूर इन्स्टाग्राम)
-
अनेक दशकांपासून सिनेमाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या कुटुंबात कोणी किती शिक्षण घेतले आहे हे जाणून घेऊया. (फोटो: रिद्धिमा कपूर इन्स्टाग्राम)
-
राज कपूर यांनीही इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याने मुंबईतील कॅम्पियन स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
शशी कपूर यांनीही साधारण शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी मुंबईतील डॉन बॉस्को येथून त्यांचे शालेय शिक्षण झाले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
रणधीर कपूर यांनी इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानेही मुंबईतील कॅम्पियन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. (फोटो: करिश्मा कपूर इन्स्टाग्राम)
-
करीना कपूर कॉलेज ड्रॉपआऊट आहे. तिने मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमध्ये बी.कॉमला प्रवेश घेतला होता.
-
दोन वर्षांनंतर, तिने कोर्स अर्धवट सोडला आणि चित्रपटांमध्ये प्रवेश केला. (फोटो: करीना कपूर इन्स्टाग्राम)
-
करिश्मा कपूरने फक्त दहावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. तिने वयाच्या १६ व्या वर्षी चित्रपटांमध्ये प्रवेश केला. (फोटो: करिश्मा कपूर इन्स्टाग्राम)
-
दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांनी मुंबईतील कॅम्पियन स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण करून अजमेरच्या मेयो कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. (फोटो: पीटीआय)
-
सध्या रणबीर कपूर हा बॉलीवूडच्या आघाडीच्या कलाकारांपैकी एक असून त्याच्या चाहत्यांची संख्याची खूप मोठी आहे.
-
रणबीर कपूरने फक्त दहावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. दहावीनंतर तो न्यूयॉर्कला गेला आणि अभिनयाचा अभ्यास करू लागला. (फोटो: इन्स्टाग्राम)
-
अभिनेता रणबीर कपूर याची पत्नी आणि आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिनेही दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. (फोटो: इन्स्टाग्राम)
-
ऋषी कपूर यांची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा अभिनय जगतापासून दूर राहते.
-
रिद्धिमाने यूकेमधून डिझाईन आणि मार्केटिंगमध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. पदवीनंतरही रिद्धिमाने शिक्षण घेतले आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
राज कपूरचे वडील आणि अभिनेता पृथ्वी राज कपूर यांनी पेशावरच्या एडवर्ड कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…