-
मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये सायली संजीवचंही नाव आवर्जुन घेतलं जातं.
-
सायली तिच्या कुटुंबियांच्या फार जवळ आहे. गेल्याच वर्षी ३० नोव्हेंबरला तिच्या वडिलांचं निधन झालं.
-
सायली तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. दोघांचं एकमेकांशी अगदी घट्ट नातं होतं.
-
आता एका मुलाखतीदरम्यान सायलीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
-
अभिनेत्री सुलेखा तळवर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये सायली तिच्या बाबांबाबत भरभरून बोलत होती.
-
सुलेखा यांनी तिला तुझ्या बाबांची एखादी आठवण आम्हाला सांग असं म्हटलं. यावर सायलीने त्यांच्या निधनापूर्वीची एक आठवण सांगितली.
-
सायली म्हणाली, “बाबांबरोबरच्या असंख्य आठवणी आहेत. पण बाबांचं निधन होण्यापूर्वीची मी एक आठवण सांगते. एखाद्याची इच्छाशक्ती किती उत्तम असू शकते हे मला यावरून कळालं.”
-
“बाबांचा कर्करोग बरा व्हावा म्हणून मी त्यांच्यावर उपचार करत होते. ते लवकरात लवकर बरे व्हावे हीच माझी इच्छा होती.”
-
“त्यांच्यावर उपचार करायचे होते म्हणून मी गाडी घेऊ शकले नाही. कर्करोगाच्या उपचारासाठी सगळे पैसे लागणार होते.”
-
“मी गाडी खरेदी करू शकले नाही हे बाबांच्या डोक्यात होतं. बाबांनी निधनाच्या काही दिवसांआधीच पाडव्याला मला गाडी गिफ्ट केली. त्यावेळी त्यांना उठून बसताही येत नव्हतं.”
-
“तरीही ते उठून बसले. आरटीजीएसच्या पेपरवर त्यांनी साईन केली. सगळे पैसे मला देऊन त्यांनी गाडी घ्यायला लावली. काहीही करून त्यांनी ती गाडी मला गिफ्ट दिली.”
-
सायली संजीवचं तिच्या बाबांवर प्रचंड प्रेम आहे हे तिच्या बोलण्यामधून वेळोवेळी दिसून येतं. (सर्व फोटो – फेसबुक)

Air India Plane Crash: एअर इंडिया विमानाच्या अपघातामागे पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राचा दाव्यावर AAIB म्हणाले…